नमस्कार ,
मी आर आर बोरसे प्राथमिक शिक्षक जि. प.प्राथमिक शाळा जामदरी आता जि प शाळा न्यू.पांझण ज्ञानदिप Blog मी तयार केला असून .मला Blog करण्यासाठी ज्यांनी प्रेरित केले असे शेखर सर ,ज्ञानदेव नवसारे सर, प्रकाश चव्हाण सर तसेच महाराष्ट्रातील तमाम तंत्रस्नेही शिक्षक ज्याचे Blog मी पहिले त्याचप्रमाणे MAP , OTG व इतर ग्रुप यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो .त्यामुळेच मी Blog तयार करू शकलो.
जगात जगत असतांना नवीन तंत्रज्ञान अवगत करून आपल्या विद्यार्थांना तंत्रज्ञानाच्या साहायाने प्रगत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो म्हणून महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी तंत्रज्ञानाची मोठी चळवळ उभी केली यासाठी माझा छोटा प्रयत्न म्हणून मी हा Blog तयार केला .
यात माहिती देण्याचा एक प्रयत्न! तरी माझ्या Blog ला भेट देऊन मला सहकार्य करा आणि यात काही बदल, असतील तर मार्गदर्शन करा हीच अपेक्षा आपलाच ....
आर आर बोरसे
No comments :
Post a Comment